WEATHER UPDATE : महाराष्ट्रात जोरदार पावसासोबत मोठं संकट; हवामान विभागाचा नवा अलर्ट

 

WEATHER UPDATE हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे.

 

 

अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्रातला बसला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (imd) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात पावसाची शक्यता आहे.

 

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मध्य महराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

WEATHER UPDATE दुसरीकडे कोकण आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विजांच्या कडकटासह पाऊस आणि गरापिटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबतच वादळी वारे येण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात राज्यात वाऱ्याचा वेग प्रति तास 40 – 50 किमी इतका असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

हवामान विभागाकडून राज्यातील अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, आकोला, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

तर दुसरीकडे नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास आज देखील मुंबईमध्ये हवामान कोरडं राहणार असून, हवामान निरभ्र राहिलं असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

Leave a Comment