Rain Alert : मुसळधार पावसासोबतच महाराष्ट्रावर भयानक मोठं संकट;

Rain Alert गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आजही हवामान विभागाकडून (imd) पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

 

हवामान विभागाकडून पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

दरम्यान दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

 

 

हवामान विभागाकडून बीड, लातूर, गडचिरोली, चंद्रपूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

 

Rain Alert मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील 24 तास आकाश ढगाळ राहणार असून, रिमझिम ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

नुसता पाऊसच पडणार नसून, पावसासोबत वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो असा अंदाज आहे.

 

 

 

 

दुसरीकडे पावसासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, जिल्ह्यात 46 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे.

 

 

 

 

महत्वाची सूचना पहा क्लिक करून.

Leave a Comment