IMD Alert ; महाराष्ट्रात मान्सून या तारखेला धकणार.

 

IMD Alert ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 23/मे रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदमानमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना महाराष्ट्रात मान्सून कधी येणार तसेच आठवडाभरात हवामान कसे राहिल याबाबत अंदाज वर्तवला आहे. पाहुया पंजाबराव डख यांचा सविस्तर हवामान अंदाज…

 

 

मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून मान्सूनच्या पुढिल प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. मान्सुन केरळमध्ये 01/जुनला दाखल होईल व महाराष्ट्रात 08 जुन दरम्यान सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा पावसानंतर जमीनीत चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करु नका असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

 

IMD Alert या आठवड्याचा हवामान अंदाज – पंजाबराव डख

 

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी ,सांगली ,सातारा, सोलापूर तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागात दि. 23/मे , 24/मे , 25/मे दरम्यान पाऊस पडणार आहे तसेच उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहिल.

 

पंजाबराव डख म्हणतात मान्सून केरळमध्ये 01/जुन ला दाखल होणार आहे पण 01/जुन ला राज्यात पुर्वमोसमी पाऊस सक्रिय होईल. दि. 01/जुन, 02/जुन, 03/जुन दरम्यान राज्यात पुर्वमोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment